शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सुनील पोटे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:34 IST2021-09-10T04:34:45+5:302021-09-10T04:34:45+5:30

चंद्रपूर : झाडीबोलीच्या उत्थानासाठी झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीणच्यावतीने झाडीबोली शब्दसाधक शिक्षक पुरस्कार यावर्षी बल्लारपूर तालुक्यातील जि.प.शाळा कळमना येथे कार्यरत ...

Sunil Pote honored with Shabdasadhak Shikshak Puraskar | शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सुनील पोटे सन्मानित

शब्दसाधक शिक्षक पुरस्काराने सुनील पोटे सन्मानित

चंद्रपूर : झाडीबोलीच्या उत्थानासाठी झाडीबोली साहित्य मंडळ ग्रामीणच्यावतीने झाडीबोली शब्दसाधक शिक्षक पुरस्कार यावर्षी बल्लारपूर तालुक्यातील जि.प.शाळा कळमना येथे कार्यरत सुनील शामराव पोटे यांना देण्यात आला.

मूल येथे पंचायत समिती सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमाला झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समिती सदस्य बंडोपंत बोढेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ रा. तु . महाराज अध्यासनाचे अध्यक्ष डॉ. गुरूप्रसाद पाकमोडे, मूलच्या नगराध्यक्षा रतनमाला भोयर यांच्या हस्ते शिक्षक सुनील शामराव पोटे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी गटविकास अधिकारी कळसे, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी, शशिकला गावतुरे, विलास निंभोरकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष अरुण झगडकर, लक्ष्मण खोब्रागडे आदी उपस्थित होते .

Web Title: Sunil Pote honored with Shabdasadhak Shikshak Puraskar