सुंदर चंद्रपूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही

By Admin | Updated: September 6, 2016 00:37 IST2016-09-06T00:37:08+5:302016-09-06T00:37:08+5:30

या शहराला सुंदर आणि देखणे करण्याचा संकल्प आपण केला आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही.

Sunder Chandrapur will not let the funds fall short for the city | सुंदर चंद्रपूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही

सुंदर चंद्रपूर शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही

सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन : विविध विकास कामांचे भूमिपूजन
चंद्रपूर : या शहराला सुंदर आणि देखणे करण्याचा संकल्प आपण केला आहे. जनतेच्या सहकार्याशिवाय हे शक्य होणार नाही. चंद्रपूर शहर सुंदर बनविण्यासाठी विकास कामे करणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते व अन्य कामासाठी आतापर्यंत ८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यापुढेही विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तुकूम येथे भूमिपूजनानंतर आयोजित जाहीर सभेत दिली.
चंद्रपूर शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आ. नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, बांधकामचे अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा यांच्यासह त्या त्या विभागाचे नगरसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. जिल्हयाच्या विकासाचा झंझावात सुरु झाला आहे. आतापर्यंत शहराच्या विकासासाठी ८५ कोटी रुपये देण्यात आले आहे. २८ कोटीचे नवीन नियोजन तयार करण्यात आले आहे. बाबुपेठ येथील पूल, वैद्यकीय महाविद्यालय, इरई नदीचे खोलीकरण व सौंदर्यीकरण, वनअकादमी, सैनिकी शाळा, बाबुपेठ येथील स्टेडीयमची दुरुस्ती, दाताळा ब्रिज अशी अनेक विकासाची कामे हाती घेण्यात आली आहे, असे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
बाबुपेठ परिसरात १० कोटी रुपये खर्च करुन रस्त्याची कामे केली जाणार आहे. या परिसरातील पाणी, विजेसारख्या समस्या सोडवू, असे ते म्हणाले. इरई नदीचे पहिल्या टप्याचे कामे झाले आहे. पुढे नदीच्या सौंदर्यीकरणासह ९ बंधारे तसेच नदीच्या किना-यावर उत्कृष्ठ वॉकींग तसेच सायकल ट्रॅकही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये तुकूम प्रभाग क्र.१ मध्ये १ कोटी ७६ लाखांची ४७ कामे व प्रभाग क्र.२ येथे १ कोटी३२ लाख तीन कामे, प्रभाग क्र.३ मध्ये १ कोटी ४४ लाखांची १० कामे, प्रभाग क्र. ४ मध्ये २ कोटी ३ लाखांची १० कामे, प्रभाग क्र.५ मध्ये ४३ लाखांचे एक काम, प्रभाग क्र.६ मध्ये ३५ लाखांची ६ कामे, प्रभाग क्र.७ मध्ये ५८ लाखांची १६ कामे, प्रभाग क्र. ९ मध्ये १९ लाखांची ६ कामे, प्रभाग १० मध्ये २ कोटींची ७ कामे, प्रभाग ११ मध्ये १ कोटी ६१ लाखांची ७ कामे, प्रभाग १७ मध्ये ५९ लाखांची ८ कामे, प्रभाग २९ मध्ये २९ लाखांची ४ कामे आणि प्रभाग क्र. ३० मध्ये ४४ लाखांच्या ८ कामांचा समावेश आहे. तसेच चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणच्या खुल्या जागेच्या सुशोभिकरणांच्या पाच कामांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

ज्येष्ठ नागरिकांना बहुमान
तुकूमच्या दोन्ही प्रभागात एकूण ३ कोटी ८ लाखांची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रभाग क्र. १ मध्ये १९ ज्येष्ठ नागरिकांना भूमिपूजन करण्याचा बहुमान देण्यात आला. त्यामध्ये ३१ सिमेंट काँक्रीटचे रस्ते, ३ डांबरी रस्ते व १३ नाल्यांचे भूमिपूजन करण्यात आले. तुकूमध्ये झालेल्या जाहीर सभेत ना. मुनगंटीवार यांचे ३० मोहल्ला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या सभेचे प्रास्ताविक सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले.

Web Title: Sunder Chandrapur will not let the funds fall short for the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.