रविवारी १५ जण कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST2021-07-12T04:18:31+5:302021-07-12T04:18:31+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी २५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. तसेच १५ जण नव्याने कोरोना बाधित ...

On Sunday, 15 people were infected with corona | रविवारी १५ जण कोरोना बाधित

रविवारी १५ जण कोरोना बाधित

चंद्रपूर : जिल्ह्यात रविवारी २५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. तसेच १५ जण नव्याने कोरोना बाधित झाले आहेत. जिल्ह्यात रविवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या १५ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २. चंद्रपूर तालुका १, बल्लारपूर २. वरोरा २. राजुरा २. गोंडपिपरी २. नागभीड १, सिंदेवाही २. मुल १, भद्रावती, ब्रम्हपुरी, सावली, पोंभूर्णा, चिमूर, कोरपना , जिवती व इतर ठिकाणी एकही रुग्ण आढळले नाही. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ८२७ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार १४३ झाली आहे. सध्या १५१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ८० हजार १४१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख ९२ हजार ७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३३ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: On Sunday, 15 people were infected with corona