सुमोची कारला धडक, पाच गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:45 IST2018-02-06T23:45:28+5:302018-02-06T23:45:50+5:30
राज्य मार्गावरून जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारला समोरून टाटा सुमोची धडक बसली. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले.

सुमोची कारला धडक, पाच गंभीर जखमी
आॅनलाईन लोकमत
वरोरा : राज्य मार्गावरून जाणाऱ्या स्विप्ट डिझायर कारला समोरून टाटा सुमोची धडक बसली. या अपघातात कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-चंद्रपूर मार्गावरील मजरा गावानजीक घडली.
एमएच ३१ सीएस ७३४३ या क्रमांकाची स्विप्ट डिझायर कार नागपूरकडून यवतमाळ जिल्ह्यातील कोसारा गावाकडे जात होती. दरम्यान माजरा गावानजीक टाटा सुमोची कारला समोरून धडक बसली. यात कारमधील शंकर टिकाराम टोंगे (३५), हंसराज शंकर ढोले (२४), स्वप्नील जगन टोंगे (३८), प्रवीण गजानन निरे (३०), जगनन झिबला टोंगे (४२) रा. सर्व कोसारा ता. झरी जामनी जि. यवतमाळ हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.