चंद्रपूर जिल्ह्यात शाळेमध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 15:05 IST2020-02-03T15:04:45+5:302020-02-03T15:05:11+5:30
ब्रह्मपुरी येथे बाराव्या वर्गात शिक्षणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेमधेच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

चंद्रपूर जिल्ह्यात शाळेमध्ये विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी येथे बाराव्या वर्गात शिक्षणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेमधेच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. वर्गातील भिंतीवर आय लव्ह यू असे लिहिले असल्यामुळे सदर आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
ललित रविंद्र बोराडे (१८) असे आत्महत्या करणाºया विद्यार्थ्याचे नाव आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषक विद्यालय चौगान येथे ललित बाराव्या वर्गात शिकत होता. सोमवारी ११ वाजताच्या दरम्यान जेव्हा विद्यार्थी वर्गात आले तेव्हा ललित गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना दिली असून तपास सुरू आहे.