अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान

By Admin | Updated: March 13, 2015 01:40 IST2015-03-13T01:40:07+5:302015-03-13T01:40:07+5:30

या परिसरात आलेल्या गारासह अवकाळी पावसाने उकडलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ....

The sudden loss of light falls | अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान

अवकाळी पावसाने हळदीचे नुकसान

पेंढरी (कोके) : या परिसरात आलेल्या गारासह अवकाळी पावसाने उकडलेल्या हळदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर्षी ५० टक्क्यावर उत्पादन झाले आहे.
पेंढरी, कोकेवाडा, मुरपार, केवाडा (पेठ), गोंदेडा, महादवाडी, चिमूर, खुटाळा, मोटेगाव, काजळसर, अडेगाव, बोथली, शंकरपूर, भिसी भागात वायगाव हळदीचे उत्पादन घेतल्या जाते. या परिसरात हळद काढणीचा मोसम हा जानेवारी तर फेब्रुवारी-मार्चमध्ये हळद उकळून तिला गावाच्या बाहेरील शेतात किंवा मोकळ्या मैदानावर घासून वाळविल्या जाते. सद्या या महिन्यापासून सगळीकडे हळद उकळणे व घासण्याचा मोसम सुरू आहे. परंतु १ व ८ मार्चला आलेल्या जोरदार अकाली पावसामुळे हळदीच्या खऱ्यात पाणी व गारासाचून हळदीला फोड आले आहेत. त्यामुळे हळदीचे व ढेलूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी व व्यापाऱ्याचा वाळला ढेलू पाण्यावर तरंगत आहे. राज्य शासनाने हळद शेतकऱ्यांना त्वरित नुकसाना भरपाई द्यावी, अशी मागणी वायगाव हळद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष नारायणराव मोहितकर, सरचिटणीस रमेश नान्ने, विनोद हटवादे, शंकर हटवादे यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The sudden loss of light falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.