सुभाष धोटे यांचे शक्तिप्रदर्शन, नामांकन दाखल

By Admin | Updated: September 27, 2014 01:27 IST2014-09-27T01:27:24+5:302014-09-27T01:27:24+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांनी शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आपला नामांकन अर्ज सादर केला.

Subhash Doute's performance, nomination and nomination | सुभाष धोटे यांचे शक्तिप्रदर्शन, नामांकन दाखल

सुभाष धोटे यांचे शक्तिप्रदर्शन, नामांकन दाखल

राजुरा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांनी शुक्रवारी उपविभागीय कार्यालयात आपला नामांकन अर्ज सादर केला. दरम्यान, हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली.
सोमेश्वर मंदिरात पूजन करुन त्यांनी रॅलीचा शुभारंभ केला. सोमेश्वर मंदिरातून निघालेली ही रॅली नाका क्रमांक तीने मार्गे भारत चौक, गांधी चौक, नेहरु चौक, आंबेडकर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत पोहचली. उपविभागीय अधिकारी शंतनु गोयल यांच्याकडे सुभाष धोटे यांनी नामांकन अर्ज सादर केला. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रभाकर मामुलकर, बल्लारपूर माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगरपरिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, पंचायत समिती राजुराचे सभापती निर्मला कुळमेथे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, नगर परिषद राजुराचे उपनगराध्यक्ष अरुण धोटे, चंद्रपूरच्या महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शेखर धोटे, चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूरचे नगरसेविका सुनिता लोढीया, संतोष लहामगे, रामू तिवारी, राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा पा. लांडे, श्रीधरराव गोडे, दत्तात्रय येगीनवार आदी उपस्थित होते.
माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. उमेदवार सुभाष रामचंद्र धोटे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. या रॅलीचा शुभारंभ झाल्यानंतर काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभागी झाले होते. आजपर्यंत निघालेल्या रॅलीपेक्षा ही रॅली ऐतिहासिक व प्रचंड असल्याची उपस्थितांमध्ये चर्चा होती. कार्यकत्यांच्या घोषणांमुळे रॅलीचा मार्ग दणाणून गेला होता. या रॅलीमध्ये महिला युवक काँग्रेससह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Subhash Doute's performance, nomination and nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.