सुभाष धोटे यांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:29 IST2021-05-09T04:29:18+5:302021-05-09T04:29:18+5:30

जिवती : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. ...

Subhash Dhote reviewed the health system | सुभाष धोटे यांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा

सुभाष धोटे यांनी घेतला आरोग्य व्यवस्थेचा आढावा

जिवती : राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिवती तालुक्याच्या दौऱ्यावर येऊन त्यांनी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी येथील कोरोना सेंटरला भेट दिली. येथील रुग्णांना आणि वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना विचारपूस केली. यावेळी त्यांच्या प्रयत्नाने मिळालेले तीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट दिले. तसेच त्यांनी कोरोना सेंटरसाठी वाहन उपलब्ध करून दिले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे भेट देऊन ऑक्सिजन प्लांटसाठी जागेची पाहणी केली. तसेच विदर्भ महाविद्यालय जिवती येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत कलाटे, राजुराचे तहसीलदार हरीश गाडे, सभापती अंजनाताई पवार, जिवती काँग्रेसचे अध्यक्ष गणपत आडे, डॉ. अनकडे, डॉ. गोतावळे, डॉ. अहिरकर, डॉ. उपरे, दत्ता राठोड, मारोती कुमरे, भीमराव पवार, विलास पवार, बावळे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Subhash Dhote reviewed the health system