उपकोषागार अधिकाऱ्यांची मनमानी

By Admin | Updated: March 21, 2016 00:41 IST2016-03-21T00:41:23+5:302016-03-21T00:41:23+5:30

शासकीय कार्यालयाचे देयक काढण्यासाठी उपकोषागार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आले.

Subdivision officers arbitrarily | उपकोषागार अधिकाऱ्यांची मनमानी

उपकोषागार अधिकाऱ्यांची मनमानी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : देयक काढण्यासाठी अडवणुकीचे धोरण
बल्लारपूर : शासकीय कार्यालयाचे देयक काढण्यासाठी उपकोषागार कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आले. मात्र येथील उपकोषागार अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत अडवणुकीचे धोरण अंगिकारले आहे. परिणामी कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यातील संघर्ष कोणते वळण घेणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बल्लारपूर येथील उपकोषागार कार्यालयात अधिकारी म्हणून आर.एच. जाधव रूजू झाल्यापासून नवीन वादाला तोंड फुटले आहे. विविध शासकीय कार्यलयातील कर्मचारी वर्गाचे वेतन, प्रवास भत्ता देयक वा अन्य योजनातील आर्थिक व्यवहाराचे देयक उपकोषागार कार्यालयाच्या माध्यमातून काढले जाते. यासाठी संंबंधित विभागाचे लिपिक प्रस्ताव सादर करतात. यातील काही त्रुट्याची पूर्तता करण्यासंदर्भात प्रस्तावच वापस करण्याचे धोरण उपकोषागार अधिकारी आर.एच. जाधव यांनी अवलंबिले आहे. परिणामी कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. जाणीवपूर्वक देयक अडविल्या जात असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.शासकीय देयक काढण्यासाठी अडवणुकीचे धोरण सुरू करणारे उपकोषागार अधिकारी आर.एच. जाधव यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी तहसील कार्यालयातील अजय मेकलवार, जि.एस. मेश्राम, राजू अंडेलकर, विजय उईके, दत्तराज कुळसंगे यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Subdivision officers arbitrarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.