चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंटबाजी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST2021-04-04T04:29:12+5:302021-04-04T04:29:12+5:30

अलीकडे युवावस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणी क्रेझ निर्माण झाली आहे. रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात ...

Stunt fighting continues on Chandrapur-Nagpur road | चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंटबाजी सुरूच

चंद्रपूर-नागपूर रोडवर स्टंटबाजी सुरूच

अलीकडे युवावस्थेतील तरुणांमध्ये भरधाव वाहन चालवणे व स्टंटबाजीची जीवघेणी क्रेझ निर्माण झाली आहे.

रात्री आणि दिवसादेखील हा प्रकार जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर-नागपूर रोडवर रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चार ते पाच जणांची टोळी स्टंटबाजी करीत आहे. यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे, हे स्टंटबाज वरोरा नाका चौक ते वडगाव चौकापर्यंत जाणे-येणे करीत इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही यातून अनेक अपघात घडले आहे. स्टंटबाजी करणाऱ्यांनी आपल्या सायलेेन्सरमध्ये फटाक्यासारखा आवाज काढणारे यंत्र बसविले आहे. काही सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज निर्माण होतो. या सर्व महागड्या आणि मोठ्या गाड्या आहेत. अनेकदा अशा गाड्यांवर वाहन क्रमांकदेखील नसतो. ही सर्व मंडळी वाहतूक विभागाला आव्हान देत शहरात वाहने चालवित आहेत. मात्र, त्यांच्याविरोधात कुठलीही कारवाई केली जात नाही. यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

Web Title: Stunt fighting continues on Chandrapur-Nagpur road