अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे

By Admin | Updated: August 7, 2015 00:07 IST2015-08-07T00:07:43+5:302015-08-07T00:07:43+5:30

अभ्यासिका चालविण्या मागचा उद्देश आम्हाला समाजात आंबेकराईट अधिकारी तयार करायचे आहेत.

Study culture should be created | अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे

अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे

मार्गदर्शन मेळावा : प्रशांत रोकडे यांचे प्रतिपादन
चंद्रपूर : अभ्यासिका चालविण्या मागचा उद्देश आम्हाला समाजात आंबेकराईट अधिकारी तयार करायचे आहेत. केवळ समाजात अधिकारी व कर्मचारी वर्ग निर्माण करुन भागणार नाही तर डॉ. बाबासाहेबांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची गरज आहे. यासाठी अभ्यास संस्कृती निर्माण केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रशांत रोकडे यांनी केले.
बुद्धिस्ट समन्वय कृती समिती चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रपिता ज्योतीबा फुले अभ्यासिकाद्वारे आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पालक व विद्यार्थी मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बुद्धिस्ट समन्वय कृती समितीचे अध्यक्ष हरिश सहारे होते.
या कार्यक्रमात मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनीही एमपीएससीच्या तयारी संबंधाचे लहान लहान सुक्ष्म अनुभव चर्चात्मक दृष्ट्या मेळाव्यात कथन केले. नियमीत अभ्यास हाच यशाचा गमक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच नागपूरचे अधीक्षक अभियंता अनिल बहादुरे यांनी नागपूर, अमरावती, व चंद्रपूर शहरातून १४ स्टडी सर्कल राबविण्यात येत असून चंद्रपूर येथील अभ्यासिका केंद्र त्यातील एक महत्वपूर्ण आहे. अभ्यास कसा करावा? स्पर्धा परिक्षेची शिकवणी लावणे हे एक प्रकारे फॅड आहे. मात्र अभ्यासिकेचा चांगला वापर झाला पाहिजे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे सचिव अ‍ॅड. अवधूत मांगे यांनी तर संचालन अमोल फूसाटे यांनी केले. मेळाव्याला अभ्यासिका केंद्राचे विद्यार्थी, पालक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Study culture should be created

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.