शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

विद्यार्थ्यांना मिळणार पॅकींगमध्ये धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र : ३४ दिवसांचा सोय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद झाल्या. दरम्यान, शालेय पोषण आहाराअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताच आला नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जावून शिल्लक धान्याचे वितरण केले. दरम्यान, आता उन्हाळ्यातील ३४ दिवसांचे धान्य विद्यार्थ्यांना पॅकींगच्या स्वरुपात देण्याच निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्र काढून संबंधितांना यासंदर्भात निर्देश दिले आहे.कोरोनामुळे यावर्षी मार्च महिन्यामध्येच परीक्षा न घेताच शाळांना सुटी देण्यात आली. त्यामुळे शासनाची योजना असलेल्या शालेय पोषण आहारातील शाळेमध्ये शिल्लक असलेला तांदूळ, मुगडाळ, हरभरा शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी समप्रमाणात वितरण केले. यानंतरही उन्हाळ्यातील ३४ दिवसांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बाकी असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे कठीण होत आहे. त्यामुळे शिक्षणसंचालकांना पुरवठादारांसोबत एक करार केला आहे. या अंतर्गत ३४ दिवसांचा शालेय पोषण आहार पॅकींगच्या स्वरुपात विद्यार्थ्यांंना वितरीत करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे यांनी पत्र काढून सर्व गटशिक्षणाधिकाºयांना यासंदर्भात योग्य काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. प्राप्त झालेले धान्य सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापांना घ्यावी लागणार आहे.मुख्याध्यापकांचे वाढणार टेंशनसुटी कालावधीतील धान्य वितरण करण्यासाठी मुख्याध्यापकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. अनेक नियम पाळावे लागणार असून नोंदी घ्यावी लागणार असल्याने मुख्याध्यापकांचे टेंशन वाढणार आहे. विशेष म्हणजे, प्राप्त झालेले धान्य शाळांत सुस्थितीत ठेवायचे असून कंत्राटदाराकडून योग्य वजन करून घ्यावे लागणार आहे. सोबतच शालेय व्यवस्थापन समिती, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनालाही माहिती कळवावी लागणार आहे.दर्जाचीही करावी लागणार तपासणीधान्य प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराच्या गोदामामध्ये गटशिक्षणाधिकाºयांना जावे लागणार असून तिथे धान्याचा दर्जा तपासावा लागणार आहे. एवढेच नाही तर धान्य तसेच पॅकींगसंदर्भात मुख्याध्यापक समाधानी नसल्याने धान्य बदलवून मिळणार आहे. तसेच मुख्याध्यापकांच्या सुचनेनुसार ५ दिवसांच्या आत स्वखर्चाने कंत्राटदाराला धान्य पुरवठा करावा लागणार आहे. सोबतच गावातील लोकप्रतिनिधांना माहितीही द्यावी लागणार आहे.

टॅग्स :Socialसामाजिक