अभ्यासिकेतून सामाजिक जाणिवेचे विद्यार्थी घडावेत -खोब्रागडे

By Admin | Updated: June 2, 2017 00:44 IST2017-06-02T00:44:39+5:302017-06-02T00:44:39+5:30

अभ्यासिकेतून सामाजिक जाणिवेचे विद्यार्थी घडावेत, व पुढे मोठे अधिकारी बनून त्यांनी समाजसेवेमध्ये स्वत:ला झोकून द्यावे,

Students from social sciences from studying will take turns - Khobragade | अभ्यासिकेतून सामाजिक जाणिवेचे विद्यार्थी घडावेत -खोब्रागडे

अभ्यासिकेतून सामाजिक जाणिवेचे विद्यार्थी घडावेत -खोब्रागडे

चंद्रपूर : अभ्यासिकेतून सामाजिक जाणिवेचे विद्यार्थी घडावेत, व पुढे मोठे अधिकारी बनून त्यांनी समाजसेवेमध्ये स्वत:ला झोकून द्यावे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी केले.
फुले-आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉन्फरन्स हॉल व सम्राट अशोक अभ्यासिकेच्या लोकार्पणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव देवगडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ लोखंडे, प्रकाश खरात, रेखा खोब्रागडे, अपेक्षा दिवाण, व्ही. व्ही. मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रदीप अडकिनेद्वारा संपादीत ‘क्रांतीसूर्य’ या स्मरणीकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

Web Title: Students from social sciences from studying will take turns - Khobragade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.