विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्त्व द्यावे
By Admin | Updated: January 16, 2016 01:17 IST2016-01-16T01:17:57+5:302016-01-16T01:17:57+5:30
स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी तर सुदृढ आरोग्याचा संबध प्रगतिशी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे,

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला महत्त्व द्यावे
सुधीर मुनगंटीवार : भीमणी येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
चंद्रपूर : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी तर सुदृढ आरोग्याचा संबध प्रगतिशी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला अधिक महत्त्व द्यावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोंभुर्णा पंचायत समितीच्या वतीने भीमणी येथे आयोजित तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, सभापती बापूजी चिंचोलकर, जिल्हा परिषद सदस्या अलका आत्राम, गजानन गोरंटीवार व हरीश शर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भीमणी गावातील विविध विकास कामे करण्यासाठी आमदार निधीतून २० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री यांनी केली. पुढे बोलताना, विद्यार्थ्यांनी दिलेला वृक्ष संवर्धनाचा संदेश अतिशय महत्वाचा आहे. शाळा शाळांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा कार्यक्रम राबविला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येथील विद्यार्थ्यांनी अभ्यासात निपूण होऊन प्रत्येक क्षेत्रात आपल्या गावाचे नाव लौकिक करावे, असे ते म्हणाले.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या क्रीडा स्पर्धेला विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)