ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:59+5:302021-02-05T07:36:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवरगाव : ग्रामीण भागात सोयी-सुविधा कमी असल्या तरी स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी आणि स्पर्धा ...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव : ग्रामीण भागात सोयी-सुविधा कमी असल्या तरी स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी आणि स्पर्धा परीक्षेची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठीच या वाचनालयांची निर्मिती केली आहे. या वाचनालयांमधील स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाचून परिसरातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध करावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे यांनी वाचनालयाच्या लोकार्पणप्रसंगी केले.
सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या पेन्ढरी (कोके) येथे जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे यांच्या स्थानिक निधीतून पेन्ढरी (कोके) आणि रत्नापूर येथे महात्मा ज्योतीराव फुले वाचनालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती मंदाताई बाळबुध्दे ,प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, मंगेश मेश्राम, सरपंच यादवराव मेश्राम, चंद्रकांत शिंदे, मुख्याध्यापक बंडू राऊत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरविंद किरीमकर, भास्कर गजभिये, चंद्रहास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन विनोद लांडगे यांनी केले तर मनोज मानकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.