विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करण्याची गरज

By Admin | Updated: August 5, 2014 23:43 IST2014-08-05T23:43:24+5:302014-08-05T23:43:24+5:30

विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण घेताना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची गरज आहे. अतम मत ज्येष्ठ समाजसेवक आडकूजी पाटील नन्नावरे यांनी व्यक्त केले. ते माना जमात विकास मंच

Students need to prove their abilities | विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करण्याची गरज

विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध करण्याची गरज

चंद्रपूर : विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात शिक्षण घेताना आपली कार्यक्षमता सिद्ध करण्याची गरज आहे. अतम मत ज्येष्ठ समाजसेवक आडकूजी पाटील नन्नावरे यांनी व्यक्त केले. ते माना जमात विकास मंच चंद्रपूरतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
यावेळी डॉ. पं. दे. कृ. विद्यापीठ अकोलाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेश दडमल, मंचाचे अध्यक्ष आनंदराव धारणे, राष्ट्रपती पुररस्कार प्राप्त शिक्षक तुळशीराम जांभुळे, शिक्षिका संजीवनी जांभुळे, कवी मधुकर गराठे, मंगळे गुरुजी आदी उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुरेश दडमल म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच नैतिक मुख्य जोपासणे गरजेचे असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
माता, महात्मा व परमात्मा या तीन गुणांमध्ये विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल सुरू असते. त्यामुळे त्यांच्यावर सुसंस्कृत संस्कार होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तुळशीराम जांभुळे यांनी सत्कारला उत्तर देताना व्यक्त केले. यावेळी १२ वीतील प्रतीक्षा धारणे, शुभम श्रीरामे, पवन नन्नावरे, मृणाली बारेकर, पूजा बारेकर तसेच १० वीतील साहिल घोडमारे, श्रद्धा सोनवाने, गुणवंत दडमल, सृजल रणदिवे या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक तुळशिराम जांभुळे व शिक्षिका संजीवनी जांभुळे यांचा विकास मंचातर्फे समाज भूषण पुररस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन यादवराव घोडमारे यांनी तर आभार श्रीहरी दडमल यांनी मानले. कार्यक्रमासाठी अशोक देडके, रामराव धारणे, हरीराम ढोक, हरिदास सावसाकडे, दुर्योधन सरपाते, सुधाकर ढोक, ज्ञानेश्वर गरमडे, नथ्थु झाडे, पुंंजाराम दडमल, अंकुश दडमल, नामदेव जीवतोडे व श्यामराव बडगे यांच्यासह माना जमात विकास मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Students need to prove their abilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.