विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधनवृत्ती बाळगणे आवश्यक
By Admin | Updated: November 2, 2015 00:58 IST2015-11-02T00:58:52+5:302015-11-02T00:58:52+5:30
आज शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत आपला टिकाव लागणे आवश्यक आहे. यासाठी संशोधन महत्त्वाचे आहे...

विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत संशोधनवृत्ती बाळगणे आवश्यक
मधुकर नक्षिणे : नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव
चंद्रपूर : आज शिक्षणामध्ये प्रचंड स्पर्धा असून या स्पर्धेत आपला टिकाव लागणे आवश्यक आहे. यासाठी संशोधन महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी यावर लक्ष केंद्रीत केल्यास संशोधनाच्या बळावर माणूस कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतो, असे प्रतिपादन प्रा.डॉ.मधुकर नक्षिणे यांनी केले. ते संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सवात शुक्रवारी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव किनगावर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक लेखा परीक्षक अधिकारी विजय लाखे, मंदा किन्हीकर व वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विनोद वाटेकर, गुणवंत वाटेकर उपस्थित होते.
यावेळी नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदक, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. दिवाकर किन्हीकर स्मृती पारितोषिक अणेव भाऊराव नक्षिणे, शुभम देवीदास किनगावकर, पायल मोहन वनकर यांना देण्यात आले.
रामदास वाटेकर व ताराबाई वाटेकर स्मृती पारितोषिक सरस्वती प्रशांत, निकिता देवराव वाटेकर, शीतल नरेश वाटेकर, तृशाली दत्तुजी कडूकर, काजल मोहन वनकर, प्रणय चंद्रकांत घुमे, सारीका गुलाबराव नक्षिणे, रोशन प्रदीप पांडे यांना देण्यात आले.
हा कार्यक्रम स्थानिक गोपालकृष्ण व श्री संत नगाजी महाराज देवस्थानात पार पडला. कार्यक्रमात संचालन बाबाराव कडूकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मीकांत कडूकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्यामदेव उरकुडे, रत्नाकर वानकर, शंकरराव जुनारकर, श्याम राजुरकर, दीपक नक्षिणे, विलास बडवाईक, प्रकाश चांदेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)