शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

विद्यार्थिनींना मिळाले हक्काचे विश्रांती गृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 6:00 AM

सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलींना उपलब्ध करून देण्यात आली.

ठळक मुद्देमासिक पाळीच्या भीतीतून सुटका : पालघरच्या वाडा फाऊंडेशनचा उपक्रम

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विश्राम गृह म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते ते व्हीआयपी, राजकीय पदाधिकारी यांच्यासाठी शासनाचे सर्व सोयीयुक्त गेस्ट हाऊस. मात्र हे विश्रांती गृह व्हीआयपीसाठी नसून जिल्हा परिषदेच्या व माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विध्यर्थिनींना विश्रांती घेण्यासाठी आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा फाऊंडेशन यांच्या उपक्रमातून तयार केलेले विश्रांती गृह तयार झाले आहे. या विश्रांती गृहामुळे विद्यार्थिनींची मासिक पाळीच्या भीतीतून सुटका होणार आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिक्षण अनुकूल व्हावे आणि त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी सुविधा उपलब्ध करून देणे ही या उपकमाची मुख्य उद्दिष्टये आहेत.सन २०१८ पासून हा उपकम वाडा आणि भिवंडी तालुक्यातील उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविला जात आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी एकूण पाच शाळांमध्ये करण्यात आली आणि शाळेच्या आवारात सोयीस्कर व अनुकूल अशी 'सुरक्षित जागा' मुलींना उपलब्ध करून देण्यात आली.याच धर्तीवर चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत लोहारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ग्रामीण विद्यार्थिनींना सर्व सोयीयुक्त विश्रांतीगृह तयार करण्यात आले आहे. हे विश्रांती गृह चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलाच पायलट उपक्रम आहे. या विश्रांती गृहामुळे विध्यार्थिनींच्या उपस्थितीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे.हे विश्रांती गृह समाजातील दानशूर व्यक्तीच्या सहयोगाने तयार झाले आहे. या विश्रांती गृहांचे बांधकाम विद्यार्थिनीच्या संख्येनुसार बनवण्यात येते.२०० विद्यार्थिनींसाठी २२५ स्क्वेअर फूट तर दोनशेच्या पुढे संख्या असल्यास २५० स्क्वेअर फूट भागात बांधकाम करण्यात येते. या विश्राती गृहाला अंदाजे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला आहे.विश्रांती गृहात या राहणार सुविधाचिमूर तालुक्यातील लोहारा शाळेत तयार केलेल्या विश्राती गृहात स्टडी रूम, शौचालय, बाथरूम, चेंजिंग रूम, पुस्तके, सॅनिटरी पॅड, या सुविधा असून या ठिकाणी हेल्थ कॅम्पसुध्दा राबविण्यात येणार आहेत.वाडा फाऊंडेशनद्वारे पालघर, भिवंडी परिसरात हे विश्रांती गृह दानदात्याच्या सहकार्याने तयार केले असून तिथे हा उपक्रम यशस्वी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा पायलट प्रोजेक्ट असून विद्यार्थिनींना भेडसावणारी पाळीची समस्या या विश्रांती गृहामुळे दूर होऊन उपस्थितीचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. यामध्ये आरोग्य कॅम्पसुद्धा घेण्यात येणार आहेत.-निशा पाटीलप्रोजेक्ट हेड, वाडा फाऊंडेशन, पालघर

टॅग्स :Studentविद्यार्थी