कौशल्य विकासातून विद्यार्थी घडतो

By Admin | Updated: September 14, 2015 00:50 IST2015-09-14T00:50:54+5:302015-09-14T00:50:54+5:30

देशात कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी कौशल्य विकासातून घडतो.

Students develop skills development | कौशल्य विकासातून विद्यार्थी घडतो

कौशल्य विकासातून विद्यार्थी घडतो

राजुरा : देशात कौशल्य विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून ग्रामीण भागातील विद्यार्थी कौशल्य विकासातून घडतो. त्यामुळे छोटे-छोटे व्यावसायिक अभ्यासक्रम गावागावात सुरू झाल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, असे प्रतिपादन श्री शिवाजी महाविद्यालयातील एमसीव्हीसी अभ्यासक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना राजुराच्या नगराध्यक्षा मंगला आत्राम यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे उपाध्यक्ष दत्तात्रय येगीनवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्रभारी प्राचार्य वामन उलमाले, कला-महाविद्यालय कोरपनाचे प्राचार्य संभाजी वरकड, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.ख्वॉजा मोईनुद्दीन, शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.एच.पी. डोर्लीकर, कृष्णकुमार पोचम, फुलशेतीवर मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक प्रा.दत्ता कुलळर्णी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य वामन उलमाले यांनी केले. संचालन प्रा. रामनंदेश्वर गिरडकर यांनी केले. आभार प्रा.एच.पी. डोर्लीकर यांनी मानले. याप्रसंगी प्रामुख्याने डॉ.भोंगाडे, प्रा. लाटेलवार, प्रा.शेंडे, प्रा.वनिता बारई, प्रा.चापले, प्रा.संतोष देठे, प्रा.राजेश खेराणी, प्रा.भगवान धोंगडे, प्रा.राठोड, एमसीव्हीसी विभागाचे प्रा.संजय ढवस, प्रा.के.डी. येगीनवार, प्रा.बी.यू. बोर्डेवार, प्रा.विकास बल्की, प्रा.डी.सी.महा, उमेश मारशेट्टीवार, लक्ष्मीनारायण तन्नीरवार उपस्थित होते.
१५ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता नागपूरचे प्रा.संजय पवार, डॉ.संध्या पवार यांचे व्याख्यान, २१ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आॅफीस मॅनेजमेंटवर तहसिलदार धर्मेश फुसाटे यांचे मार्गदर्शन, २९ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शेतकरी मेळावा, १२ आॅक्टोबरला ११.३० वाजता आधुनिक शेतीवर लपविभागीय कृषी अधिकारी नंदकुमार घोडमारे यांचे मार्गदर्शन, १३ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता ‘मिशन आयएएस’ व्याख्यान, १६ आॅक्टोबरला टाईम मॅनेजमेंटवर प्रा.एच.पी. डोर्लीकर यांचे व्याख्यान हे कार्यक्रम होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Students develop skills development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.