शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताहेत विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 16:55 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना: पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत यंत्रणांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच विक्री व वाहतूक प्रतिबंधाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी बुधवारी (दि. ८) संबंधित यंत्रणेचा आढावा घेतला. शाळा व महाविद्यालयील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यात कदापि अडकू देऊ नका. त्यासाठी अलर्ट राहा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

यावेळी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, केंद्रीय जीएसटी विभागाचे विजयकुमार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, टपाल खात्याचे उपविभागीय निरीक्षक एम. एम. चव्हाण, शिक्षणाधिकारी (प्रा.) आश्विनी सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, शिक्षण विभागाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थ प्रतिबंधबाबत जनजागृती करावी. या पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना अवगत करणे तसेच विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी यासोबत वाहतुकीचे नियम, पुढील शैक्षणिक सत्रापासूनच वर्षभराचे आरोग्याबाबत मार्गदर्शन, तंबाखूजन्य नियोजन करावे. यात जनजागृती, पदार्थांच्या सेवनामुळे होणारे पथनाट्य, रॅली आदींच्या माध्यमातून दुष्परिणाम आदी बाबी समजावून सांगाव्यात. एमआयडीसी परिसरात असलेल्या बंद कारखान्यांची यादी करून तेथे पोलिसांच्या सहकार्याने तपासणी करण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. 

टोल फ्री क्रमांकावर करा तक्रारकुठेही अमली पदार्थाची लागवड, वाहतूक व विक्री होत असल्यास याबाबतची माहिती 'वंदे मातरम् चांदा' या तक्रार प्रणालीचा टोल फ्री क्र. १८००२३३८६९१, टोल फ्री क्रमांक ११२ आणि चाइल्ड लाइनचा टोल फ्री क्र. १०९८ वर तत्काळ द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी बैठकीत सांगितले. यावेळी शाळा महाविद्यालयात जनजागृती व सामाजिक संघटनांचे सहकार्य घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

गांजा लागवडीबाबत अलर्टकृषी विभागाने शिवाराच्या नावाखाली गांजा, खसखस व इतर अमली पदार्थ वनस्पतींची लागवड तर होत नाही. याबाबत संबंधित कृषी सहायक, ग्रामसेवक व पोलिस पाटील माहिती द्यावी, पोस्ट विभागाने जिल्ह्यात येणाऱ्या पार्सलचे स्कॅनिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अमली पदार्थ विरोधी कार्यवाहीचा नियमित आढावा, पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेली कारवाई, एनडीपीएस अंतर्गत अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थStudentविद्यार्थीchandrapur-acचंद्रपूर