विजेच्या झटक्याने विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:59 IST2017-07-03T00:59:42+5:302017-07-03T00:59:42+5:30
तालुक्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या बेलारा येथील जि.प. शाळेत एक विद्यार्थ्याला विजेचा झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

विजेच्या झटक्याने विद्यार्थी जखमी
उजवा हाताला दुखापत : बेलारा जिल्हा परिषद शाळेतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : तालुक्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या बेलारा येथील जि.प. शाळेत एक विद्यार्थ्याला विजेचा झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला. तो खेळत असताना अर्थिंगला हात लागल्याने विजेचा झटका लागला. ही घटना शनिवारी १२.३० वाजता घडली. कुणाल घनश्याम दोडके (९) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.
कुणाल हा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी नसून तो आश्रम शाळेत शिकतो. घराच्या बाजुलाच जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेच्या पटांगणात तो मित्रासोबत खेळत होता. खेळता-खेळता शाळेच्या भिंतीला लावून असलेल्या अर्थिंगला त्याचा उजवा हात लागल्याने तो चिपकला. त्यामुळे त्याने व मित्रांनी आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्याला अर्थिंग पासून सोडविन्यासाठी अनेक कुल्पत्या केल्या. तेव्हा त्याचा हात अर्थिंगपासून दूर झाला व गावकऱ्याच्या सर्तकतेने कुणालचा जीव वाचला.
गावकऱ्यांनी कुणालला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. त्यांच्या उजव्या हाताला जखम झाल्याने व हातातील व शरीरातील रक्त गोठल्याने कुणालवर प्राथमिक उपचार करुन त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
चिमूर पं.स.चे गटशिक्षण अधिकारी किशोर पिसे यांना घटना माहित होताच त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांची भेट घेतली व पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली.
तालुक्यात जिल्हा पषिदेच्या १६० शाळा व खाजगी ४५ शाळा आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही. काही शाळेत व्यवस्था आहे पण त्या सुद्धा नाममात्र आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यामुळे शिक्षण विभागाने गंभीर दखल घेवून शाळांमध्ये अशा गंभीर घटना घडू नये, म्हणून शाळेतील विजेची व्यवस्था, देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.