पेपर हिसकला म्हणून विद्यार्थ्याचा संस्था चालकावर हल्ला
By Admin | Updated: May 28, 2017 00:41 IST2017-05-28T00:41:49+5:302017-05-28T00:41:49+5:30
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा आज बी.ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. या परिक्षेला बसलेला विद्यार्थी प्रवीण घारगाटे आई तुळजाभवानी शिक्षण संस्था चिचोली (खुर्द) ....

पेपर हिसकला म्हणून विद्यार्थ्याचा संस्था चालकावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठचा आज बी.ए. द्वितीय वर्षाचा पेपर होता. या परिक्षेला बसलेला विद्यार्थी प्रवीण घारगाटे आई तुळजाभवानी शिक्षण संस्था चिचोली (खुर्द) या केंद्रावर परीक्षा देताना दुसऱ्याशी बोलत होता. त्यावरुन त्याचा पेपर घेतला. त्यामुळे संतप्त झालेला विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी या संस्थेचे अध्यक्ष दादाराव सोळंके यांच्यावर हल्ला करुन त्यांना जखमी केल्याची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी संस्थाचालक दादाराव सोळंके यांना मारहाण करून त्यांची सोन्याची साखळीही हिसकावण्यात आली. त्या ओढताणीमध्ये अर्धी साखळी तुटून सापडली. तर अर्धी साखळी हरविली. संस्था अध्यक्षांचा मुलगा स्वप्निल सोळंके यांचीही सोन्याची साखळी तोडण्यात आली. तीसुद्धा सापडली नाही. त्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बोलत असल्यामुळे पेपर घेतला- सुभाष मेश्राम
वारंवार सांगून एैकत नसल्यामुळे प्रवीण घारगाटे याचा पेपर घेतला. त्याला थोड्या वेळानंतर पेपर दिला. तरीही मनात राग धरून पेपर झाल्यावर हल्ला केला. परीक्षा देणारा विद्यार्थी प्रवीण घारगाटे यानेही दादाराव सोळंकी यांना मारहाण केल्याची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात दिली.