एसटीची दुचाकीला धडक

By Admin | Updated: June 13, 2014 00:00 IST2014-06-13T00:00:40+5:302014-06-13T00:00:40+5:30

नागपूरहून ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

STT bicycle strikes | एसटीची दुचाकीला धडक

एसटीची दुचाकीला धडक

ब्रह्मपुरी : नागपूरहून ब्रह्मपुरी मार्गे गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीररित्या जखमी झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
अहेरी आगाराची नागपूर-अहेरी बस (क्रमांक एम.एच. १४ बी.टी. १६७५) नागपूरहून ब्रह्मपुरीमार्ग अहेरीकडे सकाळी ११ जात होती. लकडा स्टॉलजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालकाच्या उजव्या बाजूला असलेल्या विद्युत खांबाला घासत जाऊन बसने दुचाकीला (क्र. एम.एच. ३१ बी.एम. ६६३० ) जबर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या समोरील भागाखाली दुचाकी चालकासह येऊन दुचाकी चालक रुपेश ताडीराम गुरनुले (२२) गंभीर जखमी झाला. येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आल्याचे समजते. बसचालकाने घटनेनंतर पळ काढीत पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पुढील कारवाई सुरू आहे.
सदर मार्गावर नेहमीच वर्दळ असते व अनेक वाहनांची ये- जा सुरू असते. या मार्गावर आजपर्यंत अनेक अपघात घडले असल्याने सदर मार्गावर गतिरोधक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी जनतेकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: STT bicycle strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.