कोरोनासोबत जगताना व्यावसायिकांचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2020 05:00 AM2020-06-26T05:00:00+5:302020-06-26T05:01:16+5:30

'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपआपला व्यवसाय सुरु केला आहे; परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कमीच मिळत आहे.

The struggle of professionals living with Corona | कोरोनासोबत जगताना व्यावसायिकांचा संघर्ष

कोरोनासोबत जगताना व्यावसायिकांचा संघर्ष

Next
ठळक मुद्देग्राहकांची संख्या रोेडावली : बाजारपेठा सुरू; मात्र व्यवसाय मंदावला

राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : लॉकाडाऊनमध्ये घरी बसून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा संघर्ष आता सुरु झाला आहे. 'मिशन अनलाकनंतर हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्ज, उसनवारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविला; मात्र आता कोरोनासोबत जगण्यासाठी संघषार्ची लढाई सुरु झाली आहे.
'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा नव्या उमेदीने आपआपला व्यवसाय सुरु केला आहे; परंतु ग्राहकांचा प्रतिसाद कमीच मिळत आहे.
लॉकडाऊनपूर्वी शिंपी व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू होता. आठवड्यातून ५ ते ८ हजार रुपये मजुरी मिळत होती. २० ते २५ ड्रेस शिवण्यासाठी येत होते. आता केवळ सात ते आठ ड्रेस येत असल्याची माहिती येथील व्यवसायाने टेलर असलेले जांभुळे यांनी दिली. शिंपी व्यवसायाला अनलॉकनंतर गती मिळाली आहे; लॉकडाऊनमुळे येथील २०० ते ३०० रुपये रोजंदारी मिळवून उदरनिर्वाह करणारे टेलर हवालदिल झाले होते. अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर काही टेलरचा पुन्हा व्यवसाय सुरु झाला आहे. मात्र उत्पन्न मिळण्याचा वेग संथच आहे.
लॉकडाऊनपूर्वी दररोज किमान हजार रुपयांची कमाई होत होती; परंतु आता एक हजार रुपयेसुद्धा मिळत नाहीत. सर्व लोक घरात बसून असल्याने व मजुरी बंद असल्याने नागरिकांकडे पैसे नाही आहेत. याचा सरळ चप्पल, बूट विक्रीवर परिणाम झाल्याचे चप्पल विक्रेता राजेराम गणवीर यांनी सांगितले.

फुल, हार विक्रीला फटका
लॉकडाऊनपूर्वी विविध फुले, हार विक्रीच्या व्यवसायातून दररोज किमान एक हजार रुपयांची कमाई होत होती; परंतु लॉकडाऊनमध्ये मंदिरे बंद झाली. लग्नसमारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले. त्यामुळे फुल, हार खरेदी बंद झाली. आता दुकाने सुरू झाली. मात्र फुल, हार खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे, अशी माहिती फुल विक्रेता अजय कुत्रे यांनी दिली.
सकाळपासून ग्राहकाची प्रतीक्षा
सध्या आंबे विक्री सुरू आहे; मात्र सकाळपासून ग्राहक आंबे घ्यायला आले नाही. त्यामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहो. दिवसाला केवळ ३०० रुपये मिळतात; परंतु त्यासाठी दिवसभर ताटकळत बसावे लागत असल्याची व्यथा आंबे विक्री करणाऱ्या नीलकंठ नागोसे यांनी व्यक्त केली. आंबे खरेदी करण्यापूर्वी हे आंबे कुठले आहेत, ज्या भागातून आंबे आणले तेथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे का, असे अनेक प्रश्न ग्राहकांकडून विचारल्या जातात, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The struggle of professionals living with Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.