रस्त्यावरील केबल जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:11 IST2019-03-23T22:11:02+5:302019-03-23T22:11:21+5:30

येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Street cabinets on the road | रस्त्यावरील केबल जीवघेणा

रस्त्यावरील केबल जीवघेणा

ठळक मुद्देहलगर्जीपणा वाहनधारकांच्या जीवावर बेतणार : महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील ताडोबा रोड तुकूम परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून डिव्हायडरच्या अगदी मधोमध नव्याने विद्युत खांब लावण्यात आले आहेत. मात्र जुन्या विद्युत खांबाला लावलेले केबल रस्त्यावरच ठेवण्यात आल्याने संबंधितांचा हा हलगर्जीपणा एखाद्याचा जीव घेऊ शकतो. मात्र याचे कंत्राटदार तसेच महानगरपालिका प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे चित्र आहे. येथील सदर केबल तसेच खांब हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरामध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. या विकासकामांमध्ये काही जुन्या वास्तुंचे नव्याने बांधकाम करण्यात येत आहे. त्यातच जुन्या विद्युत खांबाला हटवून चंद्रपूरच्या सौंदर्यात भर पडेल, अशा नव्या स्वरुपातील विद्युत खांब लावण्याचे काम सुरू आहे.
काही ठिकाणी पोल लावण्याचे काम पूर्णही झाले आहे. मात्र जुन्या पोलला हटविण्याऐवजी ते त्याच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता आहे.
नवीन इलेक्ट्रीक पोल लावण्यात आल्यानंतर जुने खांब त्याच ठिकाणी उभे करून ठेवण्यात आले असून अडगळीत पडलेले केबलसुद्धा हटविण्यात आले नाही. सदर केबल अगदी रस्त्यावर असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची, तर वाट बघत नसेल ना, असा प्रश्न स्थानिकांसह प्रवाशांना पडला आहे.
अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष
या रस्त्याने दररोज महापौर, उपमहापौर तसेच महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी दररोज ये-जा करतात. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनातील बहुतांश अधिकारीही याच रस्त्याने जातात मात्र कोणीही या केबलसंदर्भात महापालिका प्रशासनाकडे विचारणा करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Street cabinets on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.