वादळाने छप्परे उडाली

By Admin | Updated: June 8, 2014 23:47 IST2014-06-08T23:47:22+5:302014-06-08T23:47:22+5:30

वरोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात वरोरा शहरातील शासकीय निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीमधील घरांचे छप्परे उडाली तर वीज पडून एका

The storm blew up | वादळाने छप्परे उडाली

वादळाने छप्परे उडाली

वीज पडून एकाचा मृत्यू : घरातील साहित्याची नासधूस
वरोरा :  वरोरा तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. यात वरोरा शहरातील शासकीय निवासस्थान असलेल्या पोलीस वसाहतीमधील घरांचे छप्परे उडाली तर वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला. पावसाने अनेक झाडे उलमडून पडल्याने विद्युत पुरवठा अनेक ठिकाणी खंडीत झाला होता. वीज अधिकारी व कर्मचार्‍यांनी रात्रभर परिश्रम घेत वीज पुरवठा सुरळीत केला.
वरोरा तालुक्यात शनिवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने  हजेरी लावली. रात्री ७  वाजताच्या सुमारास वीज पडल्याने जामगाव (बु.) येथील दिलीप माणिक  कळस्कर (२५) हा युवक जागीच ठार झाला. त्याच्या सोबत असलेला  एक जण गंभीर जखमी झाला. परंतु त्याचे नाव मात्र कळू शकले नाही. वरोरा शहरातील पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानावरील टिनाचे छप्पर  उडाले. त्यामुळे सिलिंग तुटून खाली पडले. छप्पर उडाल्याने पावसात घरातील साहित्याची नासधूस झाली. शहरातील अनेक भागातील झाडे वीज तारावर पडल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वीज अधिकारी व कर्मचार्‍यांनी शर्थीने प्रयत्न करीत रात्री उशिरा वीज पुरवठा सुरळीत केला.  (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: The storm blew up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.