सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी साकडे

By Admin | Updated: January 30, 2017 03:03 IST2017-01-30T03:03:47+5:302017-01-30T03:03:47+5:30

येथील श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे वरोरा येथे रेल्वे महाप्रबंधक यांना भांदक रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त सुपर

Stops for superfast trains | सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी साकडे

सुपरफास्ट रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी साकडे

भद्रावती : येथील श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे वरोरा येथे रेल्वे महाप्रबंधक यांना भांदक रेल्वे स्टेशनवर अतिरिक्त सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टॉपेज तसेच इतर सोयी-सुविधा संदर्भात निवेदन देण्यात आले.
भद्रावती हे ऐतिहासिक पर्यटन नगरी तसेच औद्योगिक शहर आहे. या ठिकाणी आयुध निर्माणी कारखाना, पावरग्रीड, अनेक कोळसा खाणी आहे. या ठिकाणी कार्यरत अधिकारी व कामगार वर्ग देशातील विविध राज्यातील आहे. त्यांना तसेच स्थानिकांना रेल्वेने इतर ठिकाणी जाण्याकरिता सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टापेज नाही. त्यामुळे या ठिकाणी १२७७२ नागपूर-सिकंदराबाद, २२१२७ आनंदवन एक्सप्रेस, ११०८४ ताडोबा एक्सप्रेस, १२६१५ ग्रँड ट्रँक एक्सप्रेस, १७०३७ सिकंदराबाद-बिकानेर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा देण्याची मागणी केली असून प्रवाशांच्या सुविधेकरिता एटीएम सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली.
या आशयाचे निवेदन रेल्वे महाप्रबंधकांना श्री गुरुजी फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष प्रशांत कारेकर, संजय तोगट्टीवार, नंदू पढाल, प्रशांत ठाकूर, पंकज कातोरे, विठ्ठल बदखल, नंदू साळवे, प्रवीण देशमुख, नितेश पाटील, प्रशांत खिरटकर आदींनी दिले. यात गेल्या सहा-सात महिन्यांपासून बंद केलेला गेट उघडा करावा, आॅटोरिक्षाकरिता पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, यासह सुपर फास्ट रेल्वे गाड्यांचे स्टापेज देण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Stops for superfast trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.