स्थानिक बेरोजगारांनी पाडले काम बंद

By Admin | Updated: June 2, 2017 00:39 IST2017-06-02T00:39:10+5:302017-06-02T00:39:10+5:30

वेकोलि माजरी क्षेत्राअंतर्गत खासगी कंपनी कोळसा व माती काढण्याचे कंत्राट घेवून काम करीत आहे.

Stop work done by local unemployed | स्थानिक बेरोजगारांनी पाडले काम बंद

स्थानिक बेरोजगारांनी पाडले काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी: वेकोलि माजरी क्षेत्राअंतर्गत खासगी कंपनी कोळसा व माती काढण्याचे कंत्राट घेवून काम करीत आहे. या कंपन्यामंध्ये स्थानिकांना वगडून इतर राज्यातील लोकाना कामावर ठेवले आहे. स्थानिकांना रोजगार द्यावा, याकारिता निवेदन दिले असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहुन माजरी येथील महालक्ष्मी इंफ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीचे काम जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सुर यांच्या नेतृत्वात स्थानिक बेरोजगारानी बुधवारी बंद पाडले.
वेकोलि माजरी परिसरात ४ खासगी कंपन्या असून या कंपन्यात महाराष्ट्र अधिनियम कायदे अंतर्गत ८० टक्के स्थानिकांना रोजगार व २० टक्के इतर लोकांना असा नियम असताना सुद्धा सदर कंपनीने १० टक्केसुद्धा स्थानिकांना रोजगार दिलेला नाही.
महालक्ष्मी या खासगी कंपनीमध्ये ३८८ कामगारांपैकी ३३६ कामगार इतर राज्यातील आहे. अधिकारी सुद्धा इतर राज्यातील आहेत. कुठल्याही कंपनीमंध्ये कामगारांना कामावर घेण्यापूर्वी त्यांचे स्थानिक पोलिस स्टेशनकडून चारित्र्य तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. पोलिसांद्वारे चारित्र्य तपासणी केलेली नाही.
गेल्या दोन वर्षांपूर्वी वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत एका खासगी कंपनीत काम करणारा कामगार मध्यप्रदेश येथील छिंदवाड़ा जिल्ह्यातील परासिया या गावाचा होता. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करुन तेथून फरार झाला होता. त्या व्यक्तीला छिंदवाडा पोलिसांना माहिती मिळताच माजरीच्या खासगी कंपनीतून अटक करुन नेले होते. अश्याप्रकारचे आरोपी प्रवुत्तीचे अनेक कामगार माजरीच्या खासगी कंपन्यात असु शकते हे नाकारता येत नाही. महालक्ष्मी या खासगी कंपनीत कामबंद आंदोलनामुळे या कंपनीला व वकोलिला लाखोंचा फटका बसला. रोजगारासाठी तुरुंगात जावे लागेल तरी सुद्धा मागे हटणार नाही, असा इशाराही बेरोजगारांनी दिला आहे.

Web Title: Stop work done by local unemployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.