मुंगोलीवासीयांचा रास्ता रोको
By Admin | Updated: September 16, 2015 00:49 IST2015-09-16T00:49:20+5:302015-09-16T00:49:20+5:30
वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे परिसरात २० वर्षांपासून निर्माण झालेल्या झालेल्या समस्या व त्या सोडविण्यासाठी वेकोलि अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली चालढकल, ...

मुंगोलीवासीयांचा रास्ता रोको
घुग्घुस : वेकोलिच्या मुंगोली खुल्या कोळसा खाणीमुळे परिसरात २० वर्षांपासून निर्माण झालेल्या झालेल्या समस्या व त्या सोडविण्यासाठी वेकोलि अधिकाऱ्यांकडून सुरू असलेली चालढकल, यामुळे संतापलेल्या नागरिकांनी मंगळवारी येथे पाच तास रास्ता रोको आंदोलन केले.
दरम्यान वणीचे तहसीलदार रंजीत भोसले, वेकोलिचे मुख्य महाव्यवस्थापक राजीव दास, मुख्य क्षेत्रिय अभियंता अजयसिंग , सरपंच रुपेश ठाकरे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांची या विषयावर चर्चा झाली. त्यात गावाच्या पुनर्वसनाबाबत सेक्शन ९ ची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर रस्ता आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)