भद्रावतीत भाकपाचे रास्ता रोको

By Admin | Updated: May 14, 2015 01:38 IST2015-05-14T01:38:25+5:302015-05-14T01:38:25+5:30

भाजपा प्रणित केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्याला मारक तर भांडवलदारांना तारक असा भूमी अधिग्रहणाचा कायदा तयार करण्याचा घाट घातला आहे.

Stop the way of Bhadravati Bhakpa | भद्रावतीत भाकपाचे रास्ता रोको

भद्रावतीत भाकपाचे रास्ता रोको

भद्रावती : भाजपा प्रणित केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्याला मारक तर भांडवलदारांना तारक असा भूमी अधिग्रहणाचा कायदा तयार करण्याचा घाट घातला आहे. या कायद्याच्या विरोधात येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करून विरोध दर्शविला.
बुधवारी दुपारी १२ वाजता नागपूर-चंद्रपूर महामार्गावर पेट्रोल पंप चौकात भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैणवार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार करीत असलेल्या भूमी अधिग्रहण कायदा हा शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन हिरावून घेणारा तर भांडवलदारांना जमिनी मिळवून देवून त्यांना खरबोपती बनविणारा कायदा आहे. भारत देश हा शेतीप्रधान असल्याने शेतीवर उपजिवीका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याकडे दुर्लक्ष करून मोजक्या भांडवलाच्या फायद्यासाठी हा कायदा तयार करण्यात येत आहे.
या कायद्याला भाकपातर्फे रस्ता रोकोच्या माध्यमातून विरोध करण्यात आला. मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदारांमार्फत पाठविण्यात आले. आंदोलन जवळपास एक तासापर्यंत चालल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगच रांग लागली होती. यावेळी भूमअधिग्रहण कायदा रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात भाकपाचे जिल्हा सहसचिव संतोष दास, कार्यकारिणी सदस्य मारोती रामटेके, रमेश तावाडे, मुकेश पतरंगे, सागर भेले, सीमा पवार, डी.एच. उपासे, मनोहर ताजने, कॅप्टन अरविंदकुमार, छाया मोहीतकर, निर्मला झाडे, माला गायकवाड, लता चौधरी, सुभद्रा मेश्राम, लक्ष्मी नेवारे यांसह इतर शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येनी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Stop the way of Bhadravati Bhakpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.