पोलिसांनी कारवाई न केल्यास बंद आंदोलन
By Admin | Updated: November 20, 2015 00:43 IST2015-11-20T00:43:21+5:302015-11-20T00:43:21+5:30
पत्रकार परिषद : विग्णोज राजूरकर यांचा इशारा

पोलिसांनी कारवाई न केल्यास बंद आंदोलन
राजुरा : शिवसेनेचे राजुरा शहर प्रमुख विग्णोज राजूरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी सायंकाळी ६ वाजता शिवसेना शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आरोपींवर कारवाई न झाल्यास राजुरा शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे शहर प्रमुख विग्णोज राजुरकर म्हणाले, आरोपीला येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास राजुरा शहर २० नोव्हेंबरला बंद करु, सोबत सास्ती येथील रोडसेल बंद करून मोठे आंदोलन उभारु, असा इशारा दिला. पत्रकार परिषदेला माजी तालुका प्रमुख अॅड. राम धोटे, रामपूरचे उपसरपंच अजय सकीनाला, धोपटाळा शाखा प्रमुख उल्हास खुणे, उपतालुका प्रमुख दिनकर वैद्य, राकेश चिलकुलवार, भुवन सल्लम, मारोती धोटे, राजू काटम उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)