विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
By Admin | Updated: February 9, 2015 23:10 IST2015-02-09T23:10:48+5:302015-02-09T23:10:48+5:30
येथील जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत

विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन
चंद्रपूर : येथील जनता कॉलेज चौकामध्ये चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटी व चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीच्यावतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नागरिकांना भुलविणारी खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्याचे प्रभारी माजी राज्यमंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाष गौर, चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, चंद्रपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सुनीता लोढिया, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर विधानसभेचे उमेदवार महेश मेंढे, वरोरा विधानसभेचे उमेदवार डॉ. आसावरी देवतळे, डॉ. विजय देवतळे, आबीद अली यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज त्वरित सुरु करावे, कर्मचाऱ्यांचा बंद केलेला नक्षलग्रस्त भत्ता चालु करावा, मुस्लीम समाज आरक्षण त्वरित द्यावे, केंद्र सरकारने ओबीसी शिष्यवृत्ती द्यावी आणि क्रिमीनियरची मर्यादा वाढवावी, चंद्रपूर महानगर हद्दीतील ८० हजार घरांपैकी केवळ ३० हजार घरांना शुद्ध पाणी पुरवठा होतो. उर्वरित ५० हजार घरांना नवीन पाणी पुरवठा योजनाचा डीपीआर तयार करून शासनाकडे मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून द्यावा, चंद्रपूर जिल्ह्यातील ३४ खाणीतून होणाऱ्या कोळसा आवंटन रद्द करण्याकरिता सीबीआय चौकशी करण्यात यावी व राष्ट्रीय हरित लवादा नुसार खुल्या प्लॉटवर कोळशाची विक्री करता येत नाही तसेच ओवरलोड ट्रक व बगर ताडपत्री टाकून ट्रक चालवणे बंधनकारक असतानाही खुले आम वाहतूक केली जात आहे यावर निर्बंध आणाला. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक केली. (नगर प्रतिनिधी)