इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST2021-07-18T04:20:33+5:302021-07-18T04:20:33+5:30

रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर व अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत होत्या. काही महिन्यांपासून या सर्व पॅसेंजर ...

Stop at Intercity Express at Virur Railway Station | इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या

इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या

रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर व अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत होत्या. काही महिन्यांपासून या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहेत. या सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे देण्यात यावा. येथील नागरिकांसह उद्योग वर्गांना, तसेच व्यापारी बांधवांना याचा फायदा होईल, असेही माजी आमदार धोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

भाग्यनगर पॅसेंजर १७२३३ ही गाडी सिकंदराबाद ते बल्लारपूर, १७२३४ ही गाडी बल्लारपूर ते सिकंदराबाद ही गाडी रोज या मार्गावर धावत असते, तसेच रामगिरी पॅसेंजर गाडी ५७१२१ ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर, ५७१२२ ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ या मार्गावर धावत असते. अजनी पॅसेंजर ५७१३५ ही गाडी काजीपेठ ते अजनी, ५७१३६ अजनी ते काजीपेठ ही गाडीसुद्धा या मार्गावर नेहमीच धावत असते, तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस ०२७७१ ही गाडी सिकंदराबाद ते रायपूर व ०२७७२ ही गाडी रायपूर ते सिकंदराबाद रोज विरुर स्टेशन रुळावरून धावत असते. या गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे दिल्यास येथील नागरिकांना सोयीस्कर होईल, याकडेही लक्ष ॲड. संजय धोटे यांनी लक्ष वेधले आहे.

170721\img-20210717-wa0152.jpg

फोटो संजय धोटे

Web Title: Stop at Intercity Express at Virur Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.