जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:04+5:302021-04-01T04:29:04+5:30
पोलीस अधीक्षकांना निवेदन : वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा शहरात अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात ...

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा
पोलीस अधीक्षकांना निवेदन : वंचित बहुजन महिला आघाडीची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा शहरात अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यासोबतच अन्य अवैध धंदेही सुरू आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करून शहरातील अवैध धंदे बंद करावे, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
शिष्टमंडळात वंचित बहुजन महिला आघाडीच्या माजी नगरसेवक, जिल्हा सल्लागार लता साव, शहराध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा संघटक अंकिता ठके, शहर उपाध्यत्रक्ष सुलभा चांदेकर, पुष्पलता कोटांगले, जिल्हा कोषाध्यक्ष प्रज्ञा रामटेके, रमा मेश्राम, शहरसचिव पोर्णिमा जनुघरे, इंदू डोंगरे, नेहा मेश्राम, दर्शना तिवारी, संध्या फुलेझले आदींची यावेळी उपस्थिती होती.