पांढरकवडा गाव परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST2021-03-27T04:29:31+5:302021-03-27T04:29:31+5:30

फोटो : आमदार जोरगेवार यांना निवेदन देताना सरपंच सूरज तोतडे व महिला मंडळ घुग्घुस : घुग्घुस पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ...

Stop illegal sale of liquor in Pandharkavada village area | पांढरकवडा गाव परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा

पांढरकवडा गाव परिसरातील अवैध दारू विक्री बंद करा

फोटो : आमदार जोरगेवार यांना निवेदन देताना सरपंच सूरज तोतडे व महिला मंडळ

घुग्घुस : घुग्घुस पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरकवडा गाव परिसरात दिवसेंदिवस अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावातील महिलाना त्रास होत आहे. संतप्त महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच घुग्घुस पोलीस निरीक्षक आणि आमदार किशोर जोरगेवार यांना सरपंच सूरज तोतडे यांच्या नेतृत्वात निवेदन देत दारू बंद करण्याची मागणी केली आहे.

जिल्हात दारू बंदी आहे. असे असले तरी घुग्घुस परिसरातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री केली जात आहे. दारू विक्रेत्यांच्य मनमानी धोरणामुळे महिलांना त्रास होत आहे. अल्पवयीन मुलेसुद्धा दारू व्यवसायाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील दारू पूर्णपणे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, दारू बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही महिलांनी दिला आहे.

Web Title: Stop illegal sale of liquor in Pandharkavada village area