नकोडा रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:53 IST2021-03-04T04:53:28+5:302021-03-04T04:53:28+5:30

घुग्घुस : नजीकच्या नकोडा व एसीसी सुरक्षा भिंतीला लागून आलेल्या रस्त्यावरून दिवसरात्र होत असलेल्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर ...

Stop heavy traffic on Nakoda Road | नकोडा रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा

नकोडा रस्त्यावरील जड वाहतूक बंद करा

घुग्घुस : नजीकच्या नकोडा व एसीसी सुरक्षा भिंतीला लागून आलेल्या रस्त्यावरून दिवसरात्र होत असलेल्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर उडत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

या रस्त्यावरील जड वाहतुकीवर प्रतिबंध करण्याच्या मागणीचे निवेदन जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या नेतृत्वात सरपंच किरण बांदूरकर यांनी ठाणेदार राहुल गांगुर्डे यांना दिले.

घुग्घुस -एसीसी- नकोडा-मुंगोली मार्गावरून वाहतूकदार कोळसा वाहतुकीसाठी मनाई असताना डिझेल व कमी वेळात अधिक कोळसा वाहतूक करण्याच्या उद्देशाने या रस्त्याचा उपयोग रात्रंदिवस करीत आहे. त्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या रस्त्यावरील जड वाहतूक बंद करण्याची मागणी सरपंच किरण बांदूरकर यांनी ठाणेदाराला दिलेल्या निवेदनात केली आहे.

यावेळी उपसरपंच मंगेश राजगडकर, माजी सरपंच ऋषी कोवे, ग्रा.प. सदस्य प्रभाकर लिंगमपेल्ली, विठ्ठल तुरणकार, राजय्या कंपय्या, चंदू ताला, स्वामी गिड्डे, महादेव वाघमारे उपस्थित होते.

Web Title: Stop heavy traffic on Nakoda Road