अनुसूचित जातीवरील अत्याचार थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:15+5:30

नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. बिड जिल्ह्यातील तीन आदिवासी लोकांची हत्या करण्यात आली.

Stop the atrocities on the Scheduled Castes | अनुसूचित जातीवरील अत्याचार थांबवा

अनुसूचित जातीवरील अत्याचार थांबवा

ठळक मुद्देवंचित आघाडीचे निदर्शने : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : महाराष्ट्रात दिवसेंदिवस अनुसूचित जातीच्या लोकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. लॉकडाऊन काळात अनेक अनुसूचित जातीच्या बांधवांवर अत्याचार झाले. पण अद्यापही त्या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे या विरोधात वंचित बहुजन आघाडी व अनुसूचित जातीच्या बांधवांनी निदर्शने देत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथील अरविंद बन्सोड याला एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने विष देऊन मारले. शिर्डी येथील सागर शेजवळ याची हत्या करणाऱ्याला पॅरोलवर सोडण्यात आले. विराज भालचंद्र जगताप रा. पिंपळे सौदागर यांची जातीयवादी सुडाने हत्या करण्यात आली. बिड जिल्ह्यातील तीन आदिवासी लोकांची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणात त्वरित लक्ष घालून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि हत्या प्रकरणात ३०२ कलमांर्तगत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बहुजन वंचित आघाडी व अनुसूचित जातीच्या बांधवांनी निदर्शने दिली. त्यानंतर उपविभागीय अधिकाºयांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना लिना रामटेके, ज्योती वावरे, सुकेसनी बन्सोड, शीतल गायकवाड, योगिता रामटेके, साधना लोखंडे, स्नेहा रामटेके, डॉ. प्रेमलाल मेश्राम, डॉ. राहुल मेश्राम, सुखदेव प्रधान, अनिल कांबळे, अरुण सुखदेवे, विलास मैद, मदन शेन्डे आदी उपस्थित होते.

Web Title: Stop the atrocities on the Scheduled Castes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.