सायबर गुन्ह्यांपासून दूर राहावे

By Admin | Updated: February 26, 2017 00:49 IST2017-02-26T00:49:48+5:302017-02-26T00:49:48+5:30

आज विज्ञानामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही फार वाढले आहे.

Stay away from cybercrime | सायबर गुन्ह्यांपासून दूर राहावे

सायबर गुन्ह्यांपासून दूर राहावे

विकास मुंढे : सायबर क्राईमवर पालक व विद्यार्थ्यांची जनजागृती
चंद्रपूर : आज विज्ञानामुळे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही फार वाढले आहे. अशा गुन्ह्यांची माहिती करून देणे व त्यापासून दूर कसे राहावे, हे सांगणे फार गरजेचे आहे, असे प्रतिपादन सायबर क्राईमचे प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे यांनी केले.
दृष्टी सामाजिक व शैक्षणिक संस्थेतर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुंढे बोलत होते. त्यांनी दृष्टी संस्थेचे मुले व पालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. तसेच मुलांशी व पालकाशी सायबर गुन्ह्यााबद्दल संवाद साधला. त्यांनी असे बरेच उपक्रम पालकासाठी घेण्याची फार गरज असल्याचे म्हटले.
सायबर क्राईमचे अधिकारी राहुल यांनी क्लिपिंगद्वारे विद्यार्थ्यांना कोणकोणते गुन्हे घडू शकतात, त्याबाबत समजावून सांगितले. तसेच त्या गुन्ह्यांपासून सावध राहण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याची माहिती दिली.
वेगवेगळ्या स्थानिक उदाहरणाद्वारे व्हिडिओ दाखवून मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती, त्यापासून बचाव आणि सावधगिरीबद्दल जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पालकानांही त्यांच्या मुलांच्या दैनंदिन हालचालीबद्दल माहिती घेता यावी, आपली मुले नेट किंवा मोबाईलद्वारे काही विघातक गोष्टींकडे ओढले जात आहेत काय, याची पडताळणी करण्याबद्दल माहिती देण्यात आली.
प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा जामदार यांनी केले. त्यांनी अनेकवेळा असे गुन्हे नकळतपणे घडत असल्याचे स्पष्ट केले. कारण आपल्याला आपण काही चुक करीत नाही ना, हेसुद्धा कळत नसते. म्हणून प्रत्येक शाळेत असे कार्यक्रम व्हायला हवे आणि पालक व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवयाला हवी, असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन वंदना धात्रक यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव अ‍ॅड. विद्या मसादे यांनी केले. कार्यक्रम आयोजनात संस्थेच्या मुग्धा कानगे, सारिका बोराडे, अ‍ॅड. निमिषा, उषा मसादे, रोहिणी साखरकर, सविता बेले यांनी मदत केली. (प्रतिनिधी)

Web Title: Stay away from cybercrime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.