लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : एखादे विमानतळ वाटावे, असे देखणे रुप. राज्यातील कोणत्याही बसस्थानकात उपलब्ध नाही, अशा सोईसुविधांनी युक्त, अत्याधुनिकता, चकचकितपणा यामुळे पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे राज्यातील एकमेव टच बसस्थानक बल्लारपुरात जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे.येथील प्रशस्त व सुसज्ज बसस्थानकाचे लोकार्पण बुधवारी सायंकाळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंनदसिंह चंदेल होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे अध्यक्ष देवराव भोंगळे, नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, न. प.च्या उपाध्यक्ष मिना चौधरी, राज्य परिवहन चंद्रपूर विभागाचे नियंत्रक रा. ना. पाटील, राहुल मोडक यांची उपस्थिती होती. मंचावर नगर परिषदेचे भाजपाचे नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते, पंचाय त समिती सदस्य हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बल्लारपूर येथे अद्यावत बसस्थानक बनून त्याचे आज लोकाप्रण झाले आहे. तर चंद्रपूर आणि मूल येथील बसस्थानकांचे याच पद्धतीचे काम वेगाने होत आहे. जिल्ह्यातील ही तीनही बसस्थानके प्रशस्त आणि अद्यावत रचना व सोयींनी युक्त अशी आहेत. बल्लारपूर बसस्थानकाची भव्यता, चकचकीतपणा आणि देखणेपण विमानतळासारखे आहे. या स्थानकांना शोभेशा आणि प्रवाशांना सोय व आनंद देणाऱ्या नवीन करकरीत बसेसही आता हव्यात. ही निकड लक्षात घेऊन, चंद्रपूर जिल्ह्याकरिता नवीन कोऱ्या २०० बसेस मागविण्यात आल्या असून त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होतील.गरीब व आदिवासी तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्याकरिता ज्या शासकीय योजना आहेत, त्यांचा फायदा त्यांना मिळविण्याकरिता आमचा सदोदीत प्रयत्न राहिला आहे. भिवकुंड येथे होत असलेले १२२ एकर क्षेत्रातील अद्यावत सैनिकी स्कूल, बॉटनिकल गार्डन, स्टेडियम इत्यादी विकासात्मक कामांमुळे चंद्रपूर जिल्ह्याला मोठी ओळख मिळणार आहे. आदिवासी भागातील युवक-युवतींमध्ये शौर्य मिशनमुळे आत्मविश्वासस वाढत आहे. त्यातून उत्तम खेळाडू तयार होऊन जिल्ह्याचे नाव प्रकाशमान होणार आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. याच कार्यक्रमात २८ दिव्यांगाना सायकलीचे वाटप करण्यात आले.बसस्थानक परिसरात सेल्फीला उधाणया कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिकांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. देखणे बसस्थानक पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व अभिमानाचे भाव होते. कार्यक्रमादरम्यान सेल्फीलाही चांगलेच उधाण आले होते. अनेकजण सेल्फी घेण्यात गुंग असल्याचे दिसून आले. बसस्थानक विद्युतदीपांनी सजविण्यात आले होते.सेवानिवृत्त चालकाचा सन्मानपरिवहन महामंडळात चालक म्हणून ३५ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेले व उत्कृष्ट चालक म्हणून सातवेळा पुरस्कृत ठरलेले व ३५ वर्षात ज्यांच्या हातून एकदाही कामाबाबत कुचराई झाली नाही, अपघात घडला नाही, अशा जब्बर अली अहमद यांचा ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते याप्रंसगी सत्कार करण्यात आला.
राज्यातले पहिले टच बसस्टॅन्ड लोकसेवेत रूजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:29 IST
एखादे विमानतळ वाटावे, असे देखणे रुप. राज्यातील कोणत्याही बसस्थानकात उपलब्ध नाही, अशा सोईसुविधांनी युक्त, अत्याधुनिकता, चकचकितपणा यामुळे पाहताक्षणी प्रेमात पडावे, असे राज्यातील एकमेव टच बसस्थानक बल्लारपुरात जनतेच्या सेवेत रुजू झाले आहे.
राज्यातले पहिले टच बसस्टॅन्ड लोकसेवेत रूजू
ठळक मुद्दे२०० नव्या बसेसचा ताफा जिल्ह्यात येणार : पालकमंत्र्यांची माहिती