इंधन दरवाढ थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:30+5:302021-03-19T04:26:30+5:30
ब्रह्मपुरी : पेट्रोल डिझेल की मार, अब की बार मोदी सरकार, असा नारा देऊन केंद्र सरकार स्थापन करण्यात ...

इंधन दरवाढ थांबविण्यासाठी तहसीलदारांना निवेदन
ब्रह्मपुरी : पेट्रोल डिझेल की मार, अब की बार मोदी सरकार, असा नारा देऊन केंद्र सरकार स्थापन करण्यात आले. मात्र केंद्र सरकारने जबरदस्त करवाढ केल्याने गॅस, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून गॅस, पेट्रोल, डिझेलवरील जबरदस्त करवाढ थांबवावी, यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रह्मपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत पंतप्रधान यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले.
येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुका मतपत्रिकेने घ्याव्या, विद्यापीठ परीक्षा सामान्य नागरिकांना बहिर्गत म्हणून देता यावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. तहसीलदार पवार यांना निवेदन देताना यशवंत खोब्रागडे, ॲड. नंदा फुले, विजय चव्हाण, नामदेव आष्टेकर, गणपत शेंडे, भाऊराव मेश्राम, आनंद रामटेके, ईश्वर जनबंधु, राहुल रामटेके, माेतीलाल देशमुख, प्रभू लोखंडे, नरेशचंद्र सहारे, ऋषी कावळे आदी उपस्थित होते.