दारूबंदी कायम ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:00+5:302021-02-05T07:35:00+5:30

महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसा अशा घटना कमी झाल्या असताना व लाखो महिलांच्या भावना दारूबंदीच्या समर्थनार्थ असताना दारूबंदी उठवण्यासाठी ...

Statement to Tehsildar to maintain the ban | दारूबंदी कायम ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

दारूबंदी कायम ठेवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसा अशा घटना कमी झाल्या असताना व लाखो महिलांच्या भावना दारूबंदीच्या समर्थनार्थ असताना दारूबंदी उठवण्यासाठी काही जण प्रयत्न करीत आहेत. अनेक ग्रामसभा, महिला समिती, सामाजिक संघटना यांचा दारू दुकाने सुरु करण्यास प्रखर विरोध आहे. जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता शासनाने व्यवसायावर आळा घालण्यासाठी कठोर कायदा दुरुस्ती करावा. मंत्रिमंडळ समितीने चंद्रपूर जिल्ह्याचा अभ्यास करण्यासाठी १३ सदस्यीय समिती नेमणूक केली. शासकीय व अशासकीय समिती सदस्यांनी जनतेचा अनादर होऊ न देता चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी युवा स्वाभिमान पार्टी कोरपनाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी तालुका अध्यक्ष मोहब्बत खान, प्रशांत घुंगरूड, नदीम अली, प्रमोद गिरडकर, शहेबाज अली, पवन बुरेवार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Statement to Tehsildar to maintain the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.