बल्लारपुरातील नागरिकांचे उपभोक्ता कर माफ करण्याबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:35 IST2021-01-08T05:35:42+5:302021-01-08T05:35:42+5:30
बल्लारपूर : शहरातील प्रत्येक वॉर्डात मालमत्ता कर बिलाचे वाटप होत आहे. यात अव्वाच्या सव्वा बिल पाहून नागरिकांनी डोळे वटारले ...

बल्लारपुरातील नागरिकांचे उपभोक्ता कर माफ करण्याबाबत निवेदन
बल्लारपूर : शहरातील प्रत्येक वॉर्डात मालमत्ता कर बिलाचे वाटप होत आहे. यात अव्वाच्या सव्वा बिल पाहून नागरिकांनी डोळे वटारले आहेत. हे शुल्क परत घेण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदकडे निवेदन दिले आहे.
शहरात कोविडमुळे आधीच येथील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात नगरपरिषदेने मालमत्ता करात ३६० रुपयांचे उपभोक्ता कर शुल्क लावले आहे. यामुळे मालमत्ताधारकांचे कंबरडे मोडणार आहे. या नवीन करामुळे सर्वसाधारण लोकांवर फार मोठा अन्याय झाला आहे. हा कर कमी करण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिक जी. के.उपरे, अरविंद चव्हाण, भूपेंद्र चव्हाण, ईश्वरभाई पटेल, रमाकांत तिवारी, माजी सभापती प्रभाकर मुरकुटे व अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून निवेदन दिले आहे.
बॉक्स
मालमत्ता कराशिवाय नगर परिषदने मालमत्ताधारकावर लावलेले इतर कर
अग्नी कर - ६ . ०० रुपये, वृक्ष कर - १२ . ००रुपये, शिक्षण कर ५३ . ०० रुपये, विशेष सफाई कर ६. ०० रुपये, याशिवाय यंदा लावलेला उपभोक्ता कर शुल्क ३६० रुपये.