गोंडवाना यंग टीचर्सतर्फे समस्यांचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:03+5:302020-12-31T04:28:03+5:30
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सर्व प्राध्यापक, संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी,विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित सोडविण्याची मागणी ...

गोंडवाना यंग टीचर्सतर्फे समस्यांचे निवेदन
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत सर्व प्राध्यापक, संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी,विद्यापीठाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित सोडविण्याची मागणी पदवीधर मतदार संघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले या निवेदन अंतर्गत विविध मागण्या सोडविण्याच्या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने आमदार वंजारी यांची भेट घेऊन आपली भूमिका पटवून दिली आहे. समस्या व प्रलंबित प्रश्नामध्ये कोरोना काळामध्ये परीक्षा न घेतलेल्या विद्यार्थ्यांची ती परत करणे, पुढील परीक्षेमध्ये फी समायोजित करणे, समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागू करावे, २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कार्यान्वित करणे तसेच गोंडवाना विद्यापीठांमध्ये स्थायी स्वरूपात सहसंचालक उच्च शिक्षण यांचे कार्यालय स्थापन करणे व प्राध्यापकांना प्रमोशन अंतर्गत प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने अकादमी स्टाफ कॉलेजची निर्मिती करणे या मागणीसह अनेक शिक्षक,विद्यार्थी यांच्या प्रश्नाचा समावेश आहे. निवेदन देताना संघटनेचे सचिव प्रा. विवेक गोरलावर, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते, उपाध्यक्ष डॉ.राजू किरमिरे, डॉ.प्रमोद बोधाने विभाग समन्वयक डॉ.किशोर कुडे, डॉ.अभय लाकडे, डॉ.संजय फुलझेले उपस्थित होते.