बल्लारपुरात ओबीसी महासंघाकडून तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:39+5:302021-06-25T04:20:39+5:30
बल्लारपूर : ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक प्रश्नांबाबतचे निवेदन येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शाखा बल्लारपूरच्यावतीने तहसीलदार संजय राईनचवर ...

बल्लारपुरात ओबीसी महासंघाकडून तहसीलदारांना निवेदन
बल्लारपूर : ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक प्रश्नांबाबतचे निवेदन येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शाखा बल्लारपूरच्यावतीने तहसीलदार संजय राईनचवर यांना देण्यात आले.
ओबीसींची जनगणना करण्यात यावी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी समाजाचे आरक्षण कायम ठेवावे, मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणात समाविष्ट करू नये व इतर मागण्या निवेदनात आहेत. निवेदन देताना तालुकाध्यक्ष गणपती मोरे, बामणीचे सरपंच सुभाष ताजणे, राजेश बट्टे, राजेश खेडेकर, उमेश सपाटे, सुभाष काळे, योगेश पोतराजे, मोरेश्वर लोहे, सुधीर कोरडे, उमेश वाढई, गोविंदा पोडे, सुधाकर बोबडे, महेश पानेघाटे, देविदास घुबडे, सुरेखा रासेकर, मंजुषा तुरानकर, राजू निखाडे, घनश्याम जुवारे, इंद्रभान अडबले, ज्ञानेश्वर काटोले, बंडू लांडे, महेश चौधरी, मधुकर मते, संदीप गौरकर, सुनील टोंगे आदी उपस्थित होते.