अवैद्य धंदे बंद करण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:36 IST2021-02-05T07:36:15+5:302021-02-05T07:36:15+5:30
भद्रावती : गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भद्रावती शिवसेना जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. त्याप्रसंगी त्यांना भद्रावती शहरातील ...

अवैद्य धंदे बंद करण्यासाठी गृहमंत्र्यांना निवेदन
भद्रावती : गृहमंत्री अनिल देशमुख चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भद्रावती शिवसेना जनसंपर्क कार्यालयात भेट दिली. त्याप्रसंगी त्यांना भद्रावती शहरातील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच या सर्व अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाचे पाठबळ आहे आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने संपूर्ण अवैद्य धंदे सुरू असल्याचे ना. देशमुख यांना सांगण्यात आले. या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी ना. देशमुख यांनी दिले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक नंदू पडाल, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, तालुका संघटक नरेश काळे, नगरसेवक राजू सारंगधर,शहर संघटिका माया नारळे, संगीता डाहुले, अलका वाटेकर, घनश्याम आस्वले, येशु आरगी, विशाल नारळे, सतीश आत्राम, मयुर शेडामे, गौरव नागपुरे, गुणवंत बुरडकर उपस्थित होते.