दिवाळीसाठी राज्य परिवहन महामंडळाची विशेष बस सेवा
By Admin | Updated: October 11, 2014 23:01 IST2014-10-11T23:01:46+5:302014-10-11T23:01:46+5:30
राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील

दिवाळीसाठी राज्य परिवहन महामंडळाची विशेष बस सेवा
चंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील विद्यार्थ्यांना चंद्रपूरला येणे सोयीचे होणार आहे.
दिवाळी सणानिमित्त गावाकडे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. यामुळे प्र्रवासादरम्यान अडचण निर्माण होऊ नये यासाठी लांब पल्ल्यासाठी विशेष बससेवा सुरु केल्या आहेत. चंद्रपूर विभागाद्वारे चंद्रपूर-पूणे याव्यतिरिक्त अमरावती, भंडारा, गोंदिया आदी लांब पल्ल्यांच्या बसेस सोडण्यात येणार आहेत. चंद्र्रपूरपासून दुरवरच्या ठिकाणी अनेकजण नोकरी, उद्योग व्यवसाय, शिक्षणासाठी गेले आहे. बहुतांश विद्यार्थी, व्यावसायिक दिवाळीसाठी स्वगावी येतात. त्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
प्र्रवाशांचा त्रास लक्षात घेता जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. लोकवाहिनी अशी ओळख असलेल्या राज्य परिवहन महामंडळालाच्या बसला आजही अनेकजण पसंती दर्शवितात. यामुळे गैरसोय दूर होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (नगर प्रतिनिधी)