विनोद लांडगे यांना राज्य शिक्षकरत्न सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:32 IST2021-09-14T04:32:56+5:302021-09-14T04:32:56+5:30
लेखन, कला, विज्ञान, वक्तृत्व, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेला लोकसहभागातून प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे सत्संग कॉन्व्हेंट निर्मिती, जिल्हा ...

विनोद लांडगे यांना राज्य शिक्षकरत्न सन्मान
लेखन, कला, विज्ञान, वक्तृत्व, शिक्षकाने शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून मिळवलेला लोकसहभागातून प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे सत्संग कॉन्व्हेंट निर्मिती, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे मैदान, सुंदर गार्डन स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमाला शासनाकडून पुरस्कार. पायाभूत चाचणीत वर्गाची उत्तम सरासरी, खो-खो खेळात जिल्हास्तरावर पाचव्यांदा प्रतिनिधित्व दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक, शिक्षण हक्क कायद्यानुसार १० घटकांची पूर्तता, शाळा बंद शिक्षण सुरू हा उपक्रम, २०२१ मध्ये झाडाखालची शाळा हा उपक्रम सुरू केला होता. या विविध उपक्रमांची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीने यावर्षीचा राज्यस्तरीय गुरुगौरव शिक्षकरत्न सन्मान पुरस्कार विनोद लांडगे यांना जाहीर केलेला आहे.