कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रदेशाध्यक्षांचे स्वागत
By Admin | Updated: March 15, 2015 00:59 IST2015-03-15T00:59:38+5:302015-03-15T00:59:38+5:30
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले.

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रदेशाध्यक्षांचे स्वागत
चंद्रपूर: महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी तेथील रवी भवनात चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. खा.चव्हाण यांच्या आगमनानिमित्त माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते नागपूर येथे पोहचले. त्यात चंद्रपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, प्रकाश ईटनकर, बी.सी. बॅनर्जी, प्रशांत दानव, वसंत मांढरे, तारासिंग कल्सी यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.
खा.अशोक चव्हाण यांचे रवी भवनमध्ये आगमन होताच, गजानन गावंडे, देवेंद्र बेले, संजय महाडोळे यांनी खा.चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. व निवेदन सादर केले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चंद्रपूर येथे येण्याचे निमंत्रणही दिले. याप्रसंगी जिल्ह्यातील कामगार नेते व नगरसेवकांनी वेगवेगळ्या विषयावर निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली. (प्रतिनिधी)