नागेश नीत यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:09+5:302021-01-10T04:21:09+5:30
चंद्रपूर : राज्य नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत ...

नागेश नीत यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार
चंद्रपूर : राज्य नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षक संघाचा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक नागेश नीत यांना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड यांनी लोणावळा येथील कार्यक्रमात प्रदान केला.
यावेळी राज्य शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप व मान्यवर उपस्थित होते. बाबूपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत २०१४ मध्ये केवळ ७४ विद्यार्थी होते. यंदाच्या सत्रात ८३९ पटसंख्या झाली. नावीन्यपूर्ण उपक्रम, सेमी इंग्रजी माध्यम व शाळेतील भौतिक सुविधा पुरविण्यात ही शाळा अग्रेसर आहे. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त, विशाल वाघ, संतोष कंदेवार, मुख्य लेखापरीक्षक मनोज गोस्वामी, मुख्य शहर अभियंता महेश बारई, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिकांकडून प्रोत्साहन मिळत असल्याने नावीन्यपूर्ण राबविण्यास बळ मिळाले, अशी माहिती मुख्याध्यापक नीत यांनी दिली.