कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

By Admin | Updated: January 31, 2016 01:03 IST2016-01-31T01:03:42+5:302016-01-31T01:03:42+5:30

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १३ वे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे १४ फेब्रुवारी २०१६ ला राजीव गांधी अभियांत्रिकी ...

State Level Convention of the Employees Federation | कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १३ वे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे १४ फेब्रुवारी २०१६ ला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय बाबूपेठ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिंगलदीप कुमरे यांनी दिली.
सदर अधिवेशनाकरिता केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याच्या ग्राम विकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पालवे) उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सदर अधिवेशनात केंद्र व राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून सातव्या वेतन आयोगातील शिफारशींबाबतदेखील या अधिवेशनात व्यापक चर्चा होणार आहे. तसेच सदर अधिवेशनाकरिता राज्यातून ९०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे महासंघाचे अध्यक्ष सिंगलदीप कुमरे, सरचिटणीस प्रकाश सुरमवार, कार्याध्यक्ष शालिक माऊलीकर, उपाध्यक्ष अजय टेप्पलवार, जिल्हा संघटक विलास चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे सचिव वाय.यु.काजी, नर्सेस संघटनेच्या सचिव प्रतिभा नगराळे, पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भुसारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: State Level Convention of the Employees Federation